वासुदेव आला
सूर्यप्रकाश चंद्रप्रकाशात मिसळताना पक्षांची घरटी किलबिलू लागतात, त्यांच्यासोबत, तालासुरात, टाळ-चिपळ्यांच्या तालावर वासुदेव मनाचा ताबा घेतो आणि बाळ गोपाळांचा मेळा अंथरुणातून थेट अंगणात येतो.
Wednesday, October 26, 2011
वासुदेव आला, वासुदेव आला, सकाळच्या प्रहरी हरिनाम बोला,
विकास महाडिक
वासुदेव आला, वासुदेव आला, सकाळच्या प्रहरी हरिनाम बोला, वासुदेव गातो गाणं, जागे होऊन करावं दान, नमो गजानन, नमो हनुमान, दोघांमध्ये आहे कोण बलवान यांसारखी भक्तिगीते सध्या शहरी बाबूंच्या कानावर भल्या पहाटे पडू लगाली आहेत. कालपरवापर्यंत ग्रामीण भागात किंवा शहरातील कष्टकऱ्यांच्या चाळीत फिरणारा वासुदेव अलीकडे उच्चभ्रू वसाहतीत फिरू लागला आहे. गावात असताना या वासुदेवाच्या मागे फिरणारी पोरं शहरात येऊन पोक्त झाली आहेत. ती ही भक्तिगीतं ऐकून इमारतीच्या खाली उतरत आहेत. दोन-चार भक्तिगीते कानावर पडली की या चाकरमान्यांचा हात आपोआप खिशात जात असून तीच या वासुदेवांची दिवसभराची खरी कमाई ठरत आहे. देवाचं नाव घेऊन कमावलेली ही कमाई देवाच्याच चरणी अर्पण करण्याची आमची परंपरा असल्याचे जोगिंदर साळुंखे या वासुदेवाने सांगितले.
ग्रामीण भागात दिसणारे वासुदेव आता मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबईसारख्या बडय़ा शहरात आता ग्रामीण भागात विशेषत: दिसणारे वासुदेव दिसू लागले आहेत. पुणे जिल्ह्य़ातील बारामती भागातून हे वासुदेव येत आहेत. नवी मुंबईत सध्या पाच वासुदेव फिरत आहेत. पनवेलला त्यांनी आपला डेरा टाकला आहे. जोगिंदर कारभारी साळुंखे याच्या वाटय़ाला ऐरोली आली आहे. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास जोगिंदर अनेक सोसायटी, बैठी घरे अशा वस्तीतून गणवेष आणि मुखाने परमेश्वराचे गुणगान गात फिरत आहे. नमो गजानन, नमो हनुमान, दोघांमध्ये आहे कोण बलवान या नामस्मरणाने तर शहरी बाबूंचेही पाय एक क्षण थबकतात. रामकृष्ण हरी हरी, नामाच्या गजरी, अवघा, सखा पांडुरंग सुखी ठेव सारे या अभंगाने समस्त मानवी जीवनाच्या सुखी संसाराची प्रार्थना हा वासुदेव करतो. कृष्ण गोविंद गोविंद, मला लागे तुझा छंद, माझ्या कृष्णाची वाणी, घाला तुळशीला पाणी, देव माझा, मी देवाचा, सत्य बोले माझी वाचा यासारख्या भक्तिगीतांनी वातावरण भक्तिमय होऊन जाते.
श्रावणापासून ही वासुदेव मंडळी शहराकडे कूच करतात. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळी या सणाला ही मंडळी भक्तीदान करतात. या नामस्मरणाने त्यांना वर्षांला २०-२५ हजार रुपये मिळतात. ते त्याचे गावी दान, भोजन, मंदिरबांधणी, जीर्णोद्धार करतात. पोटापाण्यासाठी ईश्वराने शेतीवाडी दिली आहे. आजोबा रामदास, वडील कारभारी यांच्यापासून २६ वर्षीय जोिगदर हे काम करतो. हे काम करताना त्याला आनंद वाटतो आणि त्यांची भक्तिगीते ऐकून शहरी बाबूंनाही गावची आठवण जागी होते!
आपल्या जातीचा जात क्रमांक आहे २४
नमस्कार मी विलास चव्हाण, आपला स्वागत करतोह माझा छोट्याश्या वेब साईट मध्ये, आपली जात म्हझे भटकी जात, डोक्यावर मोरपिसांनी सजविलेला शंकुच्या आकाराचा मुकुट, अंगात शुभ्र घोळदार झब्बा, सलवार आणि कमरेला बांधलेलं उपरणं. उपरण्यात खोवलेला पावा. एका हातात टाळ, एका हातात चिपळ्या आणि पहाटेचं वातावरण भारून टाकणार्या किनर्या आवाजाला पायात बांधलेल्या चाळांची साथ. पाहताक्षणी लहान-थोरांना भुरळ घालण्याची किमया त्याच्या - या वासुदेवाच्या - पेहरावात असते. आपल्या जातीचा क्रमांक आह Nomadic Tribes @ Bhatkya Jaatiे २४ आहे लक्षात असुद्या.
धन्यवाद.
गोविंद रामा हो, गोपाळा रामा जी जी केशवा रामा हो, माधवा रामा जी जी
सूर्यप्रकाश चंद्रप्रकाशात मिसळताना पक्षांची घरटी किलबिलू लागतात,
त्यांच्यासोबत, तालासुरात, टाळ-चिपळ्यांच्या तालावर वासुदेव मनाचा ताबा घेतो आणि
बाळ गोपाळांचा मेळा अंथरुणातून थेट अंगणात येतो.
Subscribe to:
Posts (Atom)